Monday, 6 February 2017

आता पून्हा निवडणुका येणार...
उगाच बैठका होणार
चर्चेचा भास होणार
हातावरचं घड्याळ पडणार
कमळाला बाण लागणार
इंजिन पून्हा रस्त्यावर येणार
1+1 चार होणार
आता पुन्हा निवडणूक येणार...
बाबा- दादा भांडणार
भाऊ भाईंवर गुरगुरणार
थेट दिल्लीचे आदेश येणार
लक्ष्मी दर्शन होणार
कुणाचा पगार निघणार
वाल्याचा वाल्मिकी होणार
आता पुन्हा निवडणुका येणार...
हात हातात असणार
मन दुसरीकडे असणार
कार्यकर्ता फॉर्मात येणार
खिसा गरम होणार
हातात झेंडा येणार
बांडगुळाला कोंब फुटणार
आता पुन्हा निवडणुका येणार....
सत्तेचा खेळ रंगणार
नवीन समीकरणं जुळणार
ताई माई अक्का
फॉर्ममध्ये येणार
अचानक मतदार राजा होणार
पाच वर्षांची सजा होणार
आता पुन्हा निवडणुका येणार...

Wednesday, 2 November 2011

फेसबुक की फेस टू फेस

( एक मोलकरिण आणि तिच्या मालकिणीमधील संवाद)

बाई-  काय ग... चार दिवस कामाल का आली नाहीस...
मोलकरीण-  बाईसाहेब मी गावाला गेली होती चार दिवस...
बाई- अगं मग सांगुन नाही का जायचं ?
मोलकरीण- पण बाईसाहेब मी फेसबुकवर स्टेस अपडेट केलं होतं...
बाई- काय ?
मोलकरीण- साहेबांनी कॉमेंट सुद्दा केली होती... मीस यू  म्हणुन...

असे फेसबुकवरचे जोक्स तुमच्या माझ्या प्रतेकाच्या मोबाईमध्ये रोज येत असतील... मात्र असा उथळ(पकाव) जोक आता सांगण्याचं कारण काय... कारण तर आहेच...माझ्या फेसबुकवर नुकतीच घडलेली घटना शेअर करावीशी वाटली... कारण फेसबुकवर सगळ्याच गोष्टी शेअर करतात ना... आता तुम्हाला वाटेल या पिढीतला असुन हा असं फेसबुकच्या मुळावर उठल्यासारखं काय खरडतोय ( टाईपतोय)...पण आधी माझ्या फेसबुकवर घडलेला खऱा किस्सा( यात पालिची मगर करण्याचा अजिबात प्रयत्न नाही) वाचा म्हणजे फेसबुक की फेस टू फेस हा प्रश्न तुम्हालाही पडेल....माझ्या मोबाईलमध्ये निंबुज् नावाचं सॉफ्टेवेअर असल्यामुळे मी 24 तास फेसबुक आमि गुगलवर ऑनलाईन असतो... नेहमीप्रामाणे काम संपवुन घरी जात होतो... ट्रेनमध्ये सर्वसाधारण गर्दी होती... तितक्यात माझा मोबाईल वाईब्रेट झाला... फेसबुक चाट वर मेसेज आला होता... एका मित्राचा मेसेज होता... मग सुरू झालं फेसबुक चाट...

मित्र- hi Pankaj
मी- hi
मी - h r u
मित्र-fine
मी-how was u r diwali
मित्र- not good
मी- y 
मित्र- mare badi mumy  ki death ho gayi... aaj 10th day hain
मी- i m very sorry... muzay pataa nahi thaaa..
मित्र- yaar lakin mainay FACE BOOK PAR STATUS UPDATE KIYA THAA...

...तर काकी वारल्याचं स्टेटस पठ्यानं फेसबुकवर अपडेट केलं होतं... मी ही मग ट्रेनमध्ये गर्दी आहे वगैरे बहाने सांगुन त्या चाटमधुन सुटका करून घेतली... ok by म्हणुन मित्र ऑफलाईन झाला... मग मात्र त्या चाटनं माझं डोकं चाटायला सुरवात केली...आणि मग फेसबुकच्या जमान्यात वावरणा-या मला हा प्रश्न पडला... फेस बुक की फेस टू फेस... एरवी सुख-दु:खात एकमेकांना भेटणारे आपण एकदम इतके संकुचीत कसे झालो की मृत्यु सारख्या गंभीर घटनां सुद्धा फेस बुकवर शेअर करू लागलो...फेसबुकसारख्या सोशल साईट्समुळे अनेक गोष्टी जवळ आल्या... शाळा सोडल्यानंतर फेसबुकवर शाळेतली बॅकबेंचर्सची टाळकी पुन्हा एकत्र आली... कदाचीत फेसबुकवर त्याला त्याची ती भेटली... अनेक विषय लोकांसमोर मांडण्यासाठी हक्काची जागा मिळाली... मनात साठुन राहिलेल्या गोष्टींसाठी फेसबुक ग्राफिटी वॉल बनलं... मान्य हे सगळं मान्य... मात्र आपल्या काकीच्या निधनाचं स्टेटस फेसबुकवर अपडेट करणं याला तुम्ही काय म्हणाल...मी चाळीत राहीलेलो असल्यामुळे आजुबाजुला अशी काही वाईट घटना घडली की हातातलं काम सोडून त्या घरी जाणं...अगदी  येणा-या लोकांना दिसावं म्हणुन अंगणात बल्प लावण्यपासुन ते सावलीसाठी ताडपत्री बांधण्यापर्यंतचे सोपस्कारआम्ही पार पाडलेत... त्यामुळे स्वता:ला  सोशल एनिमल म्हणवणारे आपण या वाक्यातील सोशल हा शब्द फक्त नेटवर्कींग पुरताच मर्यादीत ठेवलाय... त्यामुळे एरवी फेस टू फेस भेटून आपली  सुख-दु:ख शेअर करणारी माणसं दुरावतील की काय अशी भिती निर्माण झालीय...

पंकज दळवी...