Monday, 6 February 2017

आता पून्हा निवडणुका येणार...
उगाच बैठका होणार
चर्चेचा भास होणार
हातावरचं घड्याळ पडणार
कमळाला बाण लागणार
इंजिन पून्हा रस्त्यावर येणार
1+1 चार होणार
आता पुन्हा निवडणूक येणार...
बाबा- दादा भांडणार
भाऊ भाईंवर गुरगुरणार
थेट दिल्लीचे आदेश येणार
लक्ष्मी दर्शन होणार
कुणाचा पगार निघणार
वाल्याचा वाल्मिकी होणार
आता पुन्हा निवडणुका येणार...
हात हातात असणार
मन दुसरीकडे असणार
कार्यकर्ता फॉर्मात येणार
खिसा गरम होणार
हातात झेंडा येणार
बांडगुळाला कोंब फुटणार
आता पुन्हा निवडणुका येणार....
सत्तेचा खेळ रंगणार
नवीन समीकरणं जुळणार
ताई माई अक्का
फॉर्ममध्ये येणार
अचानक मतदार राजा होणार
पाच वर्षांची सजा होणार
आता पुन्हा निवडणुका येणार...